कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
|
कार्यशाळेत नवीन : ‘शेरखान’ स्पर्धा (अर्थात, परीक्षा परीक्षकांची!!) मित्रहो, कार्यशाळेसाठी आलेल्या प्रवेशिका आपण रोज वाचतो आहोत, त्यांवर साधक बाधक चर्चा करतो आहोत. आणि त्याचबरोबर पडद्यामागे नियामक मंडळाचे सदस्य त्यांचं मूल्यमापनही करत आहेत. या मूल्यमापनातूनच आपले तीन विजेते शेवटी निवडले जातील. पण नियामक मंडळातील काही सदस्यांनीही त्यांच्या ‘तरही’ प्रवेशिका आपल्याकडे सुपूर्त केल्या आहेत त्यांचं काय? त्यांचं मूल्यमापन कोण करणार? तर ही अतिशय महत्वाची जबाबदारी आम्ही तुमच्यावरच सोपवत आहोत. आजपासून रोजच्या प्रवेशिकांबरोबर इथे काही सुटे शेर प्रसिद्ध होतील. कुठला शेर कुठल्या गज़लकाराचा आहे ते सांगितलं जाणार नाही. तुम्ही इतकंच करायचं, तुमच्या प्रतिसादात त्यातील प्रत्येक शेराला १० पैकी गुण द्यायचे. ‘गज़लमधील प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असली पाहिजे’ हा तर सर्वमान्य संकेत आहे. आपण खरंच तसं लिहीतो का, आणि वाचतानाही प्रत्येक शेराचं खरंच स्वतंत्रपणे रसग्रहण करतो का, या दोन्हीची परीक्षाच ही. सगळे शेर प्रकाशित करून झाले, की तुम्ही दिलेल्या गुणांवरून आपण निवडणार आहोत नियामक मंडळापैकी सर्वोत्तम गज़ल. आणि त्यासाठी बक्षिसही देणार आहोत. पण ते त्या गज़लकाराला नव्हे, तर त्या गज़लमधील शेरांना ज्या सदस्याने सर्वात जास्त गुण दिले असतील त्याला - आपल्या ‘शेरखानला !! पण त्यासाठी त्या सदस्याने ‘सगळ्या शेरांवर गूण दिलेले असायला हवेत. मग, करायची सुरुवात? |
![]() |
तंत्रशुद्ध आणि दर्जेदार गझल लिहु इच्छिणार्या गझल प्रेमी व गझलकारांसाठी आम्ही ही ऑनलाईन गझल कार्यशाळा सुरू करत आहोत.
मराठी गझल.कॉम परिवारात गझल लिहिण्याची इच्छा आहे पण त्याचे तंत्र पुरेसे व नीट माहित नाही असे अनेक जण आहेत. तसंच गझलेचं तंत्र माहित आहे पण मंत्र अजून सापडलेला नाही असेही काही आहेत. आणि अर्थातच येथील अनेक सदस्य हे तंत्रशुद्ध आणि दर्जेदार गझल लिहिणारे देखील आहेत. तर जे तंत्रशुद्ध आणि दर्जेदार गझल लिहु शकतात अशांनी नवोदित गझलकारांसाठी चालवलेला हा उपक्रम आहे.
पहिल्या कार्यशाळेचा तपशील पुढे देत आहोत
या ठिकाणी सर्वांनी आपले प्रश्न/शंका "प्रतिसाद" वर टिचकी देऊन लिहाव्यात व गझल "add child page " वर टिचकी देऊन उपलब्ध होणार्या जागेत लिहाव्यात . तुम्ही "add child page " ह्या जागेत लिहीलेली गझल पूर्ण चर्चेअंतीच प्रकाशित होतील .
या गझल व संबंधित चर्चा मुख्य पानावरच्या गझल / प्रश्न / लेख मधे लिहू नयेत ही विनंती.
तर मित्रहो
आपल्या मराठीगझल.कॉम च्या पहिल्या कार्यशाळेसाठी गझलकार सारंग पतकी यांनी निवडलेलं मीटर असं आहे .
गा ल गा गा , गा ल गा गा , गा ल गा गा
सारंग यांच्याच ह्या मीटरमधल्या एका गझलची पहिली ओळ , मतल्याचा उला मिसरा, देत आहोत
हुंदका साधा तुझा सांगून गेला .
"गेला" हा रदीफ सांभाळून काफिया ला सूट ठेवण्यात आलेली आहे. लावून गेला , भेटून गेला वगैरे. फक्त दीर्घ ऊ ची अलामत सांभाळून पुढे न गेला येणं गरजेचं आहे.
कार्यशाळेचे हे नियम लक्षात असू द्या :
१. गझल पाठवण्याची अंतिम तारीख सोमवार, दिनांक ९ एप्रिल २००७ ही आहे.
२. आलेल्या प्रवेशिकेत काही तांत्रिक सुधारणा हवी असल्यास नियामक मंडळाचे सदस्य मेलवरून आपल्याशी संपर्क साधतील.
३. मंगळवार, दि. १० एप्रिलपासून गझल प्रकाशित करायला सुरुवात होईल.
४. ज्या क्रमाने गझल निर्दोष होत जातील त्या क्रमानेच प्रसिद्ध होतील.
५. आलेल्या सर्व प्रवेशिका निर्दोष होवून प्रसिद्ध झाल्यावर त्यातून सर्वोत्तम तीन प्रवेशिका निवडल्या जातील.
६. या तीन प्रवेशिकांना नियामक मंडळातर्फे गझलसंबंधी भेट देण्यात येईल.
७. सर्वोत्कृष्ट ठरलेल्या गझलकाराची नियामक मंडळातर्फे मुलाखत घेतली जाईल. ही मुलाखत फोटोसहित आपल्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकेल.
सर्व गझलकारांना हार्दिक शुभेच्छा
आणि आता सादर करत आहोत कार्यशाळेतील प्रथम गझल....
प्रतिसाद
अरे वा.... परत पर्वणीच वाचकासाठी !
वैभव आणि प्रसाद धन्यवाद दुसर्या कार्यशाळेबद्दल !
गझल्
गझलेचा नोड तयार करून प्रकाशित केला आहे. मिळाल्याची नोंद कुठे बघता येईल? प्रशासकांनी खुलासा करावा.
गझल
मिळाली आहे.
पहिली ओळ
वर दिलेला मिसरा गझल मधे वापरणे आवश्यक आहे का?
- नचिकेत आठवले
हो
नचिकेतजी
हा तरही गझल लिहीण्याचा अभ्यास आहे. हा मिसरा मतल्याचा उला मिसरा असणे आवश्यक आहे.
वा मस्त आहे उला मिसरा..
आता प्रयत्न करते ..
नव्या
नव्या कामाला लागलोच आता...
गालगागा गालगागा गालगागा.. झिंदाबाद!!
--आभाळ :)
add child page
add child page म्हणजे काय?
उत्तर
प्रमोदजी
तिथे टिचकी मारून कार्यशाळेत दिलेल्या मिसरयावर गझल पोस्ट करायची आहे.
add child page
-कुठे आहे ते child page?
-सतीश
कार्यशाळेसाठी गझल देताना असे करा
जिथे हुंदका साधा तुझा ही ओळ दिली आणि तिचा लघु दुरु क्रम दैला आहे त्याखाली शेवटी महत्वाचे आणि अप असे दोन दुवे दिसतात. शेवटी महत्त्वाचे ह्या शब्दाखाली रोमन मध्ये add child page असे दिसते त्याला टिचकी मारा, क्लिक करा आणि आपली गझल लिहा. प्रकाशित करा वर क्लिक केले की नेहमीप्रमाणे गझल सुपूर्त होईल.
मी ही
नविन कार्यशाळेबद्दल धन्यवाद.
मी ही एक पोस्ट केली आहे. कृपया तुम्हाला ती मिळाल्याची खात्री करावी.
सुधीर
गझल मिळाली का?
मी सुद्धा गझल पोस्ट केली आहे.
कृपया मिळाली का ते सांगावे.
आपले आभाळ :)
कार्यशाळा प्रवेशिका
आत्तापर्यंत या प्रवेशिका मिळाल्या आहेत :
१. रसिक
२. प्रणव काळे
३. प्रमोद बेजकर (हझल)
४. प्रमोद बेजकर (गझल)
५. जयश्री अंबासकर
६. सतीश
७. सुधीर जोशी
८. आभाळ
पुढील माहिती लवकरच प्रसिद्ध होईल.
कार्यशाळा-ए-गझल्
प्रवेशिका केंव्हापर्यंत भरल्या तरी चालतील?
आणि चर्चासत्र कधी सुरू होईल?
थोडे सविस्तर सांगितले तर बरे होईल.
क.लो.अ.
माझी ही टाकली आत्ता !
गजल मिळाली का ते सान्गने !
मीही पोस्टली...
मिही आताच टाकली आहे रे गझल!
वैभव,शतशः आभार या उपक्रमाबद्दल!
कार्यशाळा
मित्रहो,
कार्यशाळेसाठी आत्तापर्यंत १३ प्रवेशिका आलेल्या आहेत. इतक्या लवकर इतका भरघोस प्रतिसाद आलेला खरंच खूप आनंद वाटतो.
परंतु मराठीगझलच्या कुटुंबियांची संख्या आता साडेतीनशेहून अधिक झाली आहे. म्हणजे तीनशेहून अधिक प्रवेशिका अजून यायच्या आहेत. :)
तेव्हा आपल्या लेखण्या सरसावा आणि लवकरात लवकर हुंदका साधा तुझा सांगून गेला या मिसर्यावर तरही गझल लिहून पाठवा पाहू.
कार्यशाळेचे हे नियम लक्षात असू द्या :
१. गझल पाठवण्याची अंतिम तारीख सोमवार, दिनांक ९ एप्रिल २००७ ही आहे.
२. आलेल्या प्रवेशिकेत काही तांत्रिक सुधारणा हवी असल्यास नियामक मंडळाचे सदस्य मेलवरून आपल्याशी संपर्क साधतील.
३. मंगळवार, दि. १० एप्रिलपासून गझल प्रकाशित करायला सुरुवात होईल.
४. ज्या क्रमाने गझल निर्दोष होत जातील त्या क्रमानेच प्रसिद्ध होतील.
५. आलेल्या सर्व प्रवेशिका निर्दोष होवून प्रसिद्ध झाल्यावर त्यातून सर्वोत्तम तीन प्रवेशिका निवडल्या जातील.
६. या तीन प्रवेशिकांना नियामक मंडळातर्फे गझलसंबंधी भेट देण्यात येईल.
७. सर्वोत्कृष्ट ठरलेल्या गझलकाराची नियामक मंडळातर्फे मुलाखत घेतली जाईल. ही मुलाखत फोटोसहित आपल्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकेल.
आता इतकंच करायचं, या तरही गझलची 'जमीन' नीट समजून घ्यायची, हुंदका साधा तुझा सांगून गेला हा मिसरा मनात घोळवायचा, आणि किमान पाच शेर लिहून सोमवारपर्यंत आम्हाला पाठवायचे.
काही शंका वा प्रश्न असल्यास आपण माझ्याशी वा सारंग यांच्याशी येथील 'व्यक्तिगत निरोप' सुविधा वापरून केव्हाही संपर्क साधू शकता.
व्यक्तिगत निरोप
स्वाती/सारंग,
मला गजल मधे काही बदल करायचे आहेत. ते मी email द्वारे पाठवाणार होतो. परंतु तुमच्या profile मधे व्यक्तिगत निरोपासाठी लागणारी "संपर्क" ही link दिसत नाहीये. कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!
-- नचिकेत आठवले
प्रवेशिका
आत्तापर्यंत या प्रवेशिका मिळाल्या आहेत :
१. रसिक
२. प्रणव काळे
३. प्रमोद बेजकर (हझल)
४. प्रमोद बेजकर (गझल)
५. जयश्री अंबासकर
६. सतीश
७. सुधीर जोशी
८. आभाळ
९. नचिकेत आठवले
१०. विसूनाना (विजय नाईक)
११. माणिक जोशी
१२. गिरीराज्
१३. देवदत्त
वृत्ताचे उदाहरण - १
मग मित्रांनो, तरही गझलची 'जमीन' तुमच्या लक्षात आली का?
हुंदका साधा तुझा सांगून गेला हा आपल्या मतल्यातला उला मिसरा (पहिली ओळ) असायला हवा.
गेला हा रदीफ, सांगून, टाकून, राखून, बोलून असे 'ऊन' प्रत्ययाने संपणारे काफियाचे शब्द, ऊ ही अलामत, आणि
गालगागा | गालगागा | गालगागा
हे वृत्त.
सोपं आहे ना?
वृत्त समजणं सोपं जावं म्हणून याच वृत्तातली कविवर्य सुरेश भट यांची एक गझल उदाहरणादाखल देत आहे :
काटाकाट
भेटलेली माणसे घनदाट होती
थेट पोचायास कोठे वाट होती
जिंदगी माझीच होती जीवघेणी
वाचण्यासाठी कुठे पळवाट होती
ही अशी त्यांनी कशी तडजोड केली
भांडण्यासाठीच वाटाघाट होती
कालच्या गोष्टी जुन्या विसरून जा तू
एक ती वेडेपणाची लाट होती
वर्षला पाऊस दुःखाचा कशाला
सांत्वनांची कोरडी वहिवाट होती
पाहिली मीही सुखांची सभ्य वस्ती
तेथली सारी घरे मोकाट होती
कोण जाणे ते कुणाचे पत्र होते
नेमक्या जागीच काटाकाट होती
गायमाता की गेयमाता?
ह्या गा(गे)यमातेला अगदी पक्के बांधून ठेवणे जरुरीचे आहे काय?
("गायमाता, गेयमाता, गेयमाता" ) :)
की थोडे सैल सोडले तरी चालेल?
कै.?
कवीच्या नावाआधी कै. लावत नाहीत. कारण कवी किंवा लेखक त्याच्या शब्दांतून जिवंत असतो. तो कैलासवासी होत नसतो. कै. केशवसुत, कै. मर्ढेकर. कै. बापट, कै. कुसुमाग्रज असे कुणी लिहीत नाही. वरील चूक बरेच ठिकाणी झालेली आहे. ती टाळल्यास बरे वाटेल. तसेच सुरेशजी असे म्हणणेही झुळझुळीत आणि गैरमराठी वाटते.
त्या ऐवजी सरळ कविवर्य , कवी असे म्हटले तरी चालेलसे वाटते.
कार्यशाळाला शुभेच्छा!
प्रतिसाद
कार्यशाळेची संबंधित नसलेले प्रतिसाद येथून अप्रकाशित केले आहेत.
प्रवेशिका
आज समाविष्ट झालेल्या नवीन प्रवेशिका :
१४. विसूनाना (हझल)
१५. दाद
१६. सोनाली जोशी
याशिवाय विसूनाना यांच्या गझलची सुधारित आवृत्तीही मिळाली आहे.
हुंदके
आदरणीय कविवर्य सुरेश भट यांची गालगागा गालगागा गालगागा या मिटरमधील एक अप्रतीम गझल...
हुंदके
वागणे माझे जरी साधेच होते..
दाबलेले हुंदके ताजेच होते!
पीत मी गेलो जरी पेला रिकामा
झिंगण्याचे हाय बोभाटेच होते!
ते मुके अश्रू न होती माणसांचे
ते सुखाचे सभ्य कांगावेच होते!
मी जिथे गेलो तिथे निश्चिंत होतो
(दुःख माझे माझियामागेच होते!)
हे अता देती मला खांदा कशाला?
प्राण ज्यांनी घेतला ते हेच होते!
मी न केली खंत माझ्या चेहऱ्याची
पाहिलेले चेहरे माझेच होते
नीज ती होती अखेरीची तरीही
(अंतरी माझ्या कुणी जागेच होते)
गाव सोडायास केली मीच घाई
लोक मी गेल्यावरी आलेच होते!
काय तू केलेस आयुष्या फुलांचे?
श्वासही माझे कसे काटेच होते!
तरही गझल
पाठवली आहे. पाठवलेल्या गझलेवरची पुढील चर्चा कुठे करावी?
-- पुलस्ति.
गझल पाठवली आहे, मिळाली का?
आपला
रवि
कापूर
सुरेश भट यांची अजून एक नितांत सुंदर गझल गालगागा गालगागा गालगागा मिटर मध्ये!
कापूर
मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो
प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो
राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता
मी घरोब्याचे जुने काहूर होतो
तू किती केलास भेटीचा अचंबा
भूतकाळाचा जणू मी धूर होतो
मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!
तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!
प्रवेशिका
आज समाविष्ट झालेल्या नवीन प्रवेशिका :
१७. पुलस्ति
१८. रविहिरो
नियमांत नमूद केल्याप्रमाणे ज्या प्रवेशिकांमध्ये तांत्रिक सुधारणा आवश्यक असतील अश्या(च) सदस्यांशी मेलवरून संपर्क साधला जाईल.
शेरांचे अर्थ, प्रभाव, यावर मतांतरे असू शकतात. तेव्हा त्या संदर्भातली चर्चा त्या प्रवेशिका प्रकाशित झाल्यावर इथे झालेलीच सर्वांना उपयुक्त ठरेल असं वाटतं.
एकापेक्षा जास्त प्रवेशिका चालतील ना?
कृपया एकाच व्यक्तीच्या २ किंवा अधीक गझलांचा विचार व्हावा अशी नम्र विनंती.
मी ३(!) दिल्या आहेत. :) - विसुनाना.
माझी गझल मिळाली का?
पोस्ट करताना बरेचदा गडबड झाली म्हणून विचारत आहे.
प्रवेशिका
आज समाविष्ट झालेल्या नवीन प्रवेशिका :
१९. मेघधारा
२०. विसुनाना(२)
सुधारित शेर्
सारंग यांच्या इमेलला प्रतिसाद म्हणून एक शेर बदलून पाठवला होता. मिळाला कि कळवावे.
प्रवेशिका
आज आलेल्या नवीन प्रवेशिका:
२१. कुमार जावडेकर.
२२. अश्विनी
२३. चिन्नू
तसंच सुधीर जोशी यांच्या गझलची सुधारित आवृत्ती मिळालेली आहे.
प्रवेशिका
आज मिळालेल्या नवीन प्रवेशिका :
२४. विश्वास
२५. मीनू
रसिक, तुमचा सुधारित शेर मिळाला आहे.
प्रवेशिका
समाविष्ट झालेल्या नवीन प्रवेशिका :
२६. आनंदयात्री
२७. प्रमोद खराडे
२८. मिल्या
२९. sayhi2anand
३०. साती
३१. झाड
३२. प्रसाद शिरगांवकर
३३. वैभव जोशी
३४. स्वाती आंबोळे
आज अमेरिकन Eastern Standard Time नुसार मध्यरात्रीपर्यंत आलेल्या प्रवेशिका कार्यशाळेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
तेव्हा अजून ज्यांनी गझल पाठवलेली नाही त्यांनी त्वरा करा. :)
चातक
तुमची तरही गझल मिळाली आहे. कार्यशाळेतील बाकी सर्व गझल पोस्ट झाल्यावर ती पोस्ट केली जाईल.
नवीन गझल
नचिकेतच्या नंतरच्या गझल प्रकाशित होऊनही दिसत नाहीत. काय प्रॉब्लेम आहे?
दिसतात...
प्रमोद,
तो sorting चा problem वाटतो आहे. क्र. १ च्या गझल नंतर १०,११,१२ इत्यादी गझल आहेत. :-)
- नचिकेत आठवले
विश्वास ह्यांची गझल ???
विश्वास ह्यांची गझल पूर्ण प्रकाशित झाली नाही का?
म्हणजे मला फक्त दोनच शेर दिसताहेत...
प्रशासक जरा पाहाल का नेमका problem काय आहे ते?
धन्यवाद.
-आभाळ :)
शेरखान स्पर्धा
शेरखान स्पर्धा परीक्षकांची नसून कार्यशाळेत भाग घेणार्यांचीच आहे.. गझलेच्या बाराखडीवर तासून विचार करायला शिकावे हा त्यातला मुख्य उद्देश असावा. स्वत्:च्या शेरांकडे असे बघता आले तर लेखनात फरक पडेलच.
सर्वांनी त्यात भाग ह्यावा असेच वाटते.
वा
सही चाललय लोकहो :)
छान छान गझला वाचायला मिळतायत्
हे शेरखान नावाची गम्मतपण आवडली मजा वाटतीये
कार्यशाळा संपली...
पण सारंग ह्यांची जमीन असणारी मूळ गझल कधी प्रकाशित होणार आहे??
क्षमस्व !
कार्यशाळेसाठी दिलेल्या जमिनीवर गझल लिहीण्याचा तुम्हा सर्वांबरोबरच मी ही प्रयत्न करत होतो, परंतु कामाच्या व्यापात मला गझल पूर्ण करणे जमले नाही. त्याबद्दल दिलगीर आहे.
कार्यशाळेतील विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
तसेच सर्वच सहभागी सदस्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
- सारंग.