छोटा

प्रभाकर काम्बले987's picture

आयुष्याच्या वाटेवर मी असा एकला आहे
तिरडीवरती मीच आणखी, मी खांदेकरी आहे.

कशास पुसता कूशल माझे, मी हे जाणुन आहे
बाजारी या आला कुणि जो, तो सौदागर आहे.

शोडष उपचारानी ज्यानी पूजन केले आहे
गाभार्‍याला त्वरित तयानी कुलुप घातले आहे.

समाजात या उंची ज्यांची जादा दिसते आहे
किति शरिरांची गादी त्यांच्या पायाखाली आहे.

विद्वानांच्या मेळाव्याची वार्ता ऐकुन आलो
नव्या विचारा हाय परंतू इथे मनाई आहे.

जिंकायाचे 'विश्व' मला, पण ते तर छोटे आहे
जिंकायाचे 'ह्र्दय' मला, पण मी तर छोटा आहे.

बेफिकीर's picture

छान

आवडली.