ऑनलाईन गझल मुशायरा - भाग आठ

नमस्कार,

Coverमराठी गझल डॉट कॉम च्या ऑनलाईन गझल मुशायर्‍याचा आठवा भाग प्रकाशित करित आहोत!

  • भाग सात
  • निशिकान्त्'s picture

    मी खळखळ हसते

    पानगळीचा मोसम असुनी वेड्यासम मी खळखळ हसते
    वसंतातल्या मधुगंधाची चाहुल येता मन मोहरते

    शैषव सरता, स्वप्नामध्ये राजपुत्र वावरू लागला
    आटपाट नगराच्या गोष्टी अता एक थोतांड भासते

    अखंड उत्सव जीवन झाले ग्रिष्म असो की श्रावणधारा

    जागो मोहन प्यारे's picture

    जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

    मार्ग सत्याचा खुला आहे समोरी जोवरी
    जिंदगी बेभान जगतो मी असा या भूवरी

    शाम नामाने भुलूनी राधिका झाली हरी
    शोधते ती राधिकेला होउनीया बावरी

    ती रसोई जानकीची येइ वर धरणीतुनी
    नारिच्या नशिबात चूलच सत्य सांगे 'बाबरी'

    जागो मोहन प्यारे's picture

    आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

    चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
    राघवामागून सीता लालुपाठी राबडी

    जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
    तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

    काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
    ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

    जागो मोहन प्यारे's picture

    सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

    अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
    सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

    पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
    तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी

    विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
    आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी

    जागो मोहन प्यारे's picture

    बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये

    बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये
    जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये

    जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी
    सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये

    जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे
    बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये

    वैभव आलिम's picture

    ओंजळी भरून घे ( तरही गझल )

    वृत्त - चामर
    लगावली - गालगाल गालगाल गालगाल गालगा

    आरसा नको बघूस तू ,मला बघून घे
    रूप आज डोळीयांत कैद ,न्याहळून घे

    गुंतलो सखी तुझ्या अदं!मधी अता पुरा
    तोल आज जाऊ पाहि ,आज सावरून घे

    तीर मारती मला , नयन तुझे इथे तिथे

    निशिकान्त्'s picture

    का जगावे?

    बंधनी कोणी खुशीने का जगावे?
    पिंजर्‍याला मानती आकाश रावे

    पेटवा हाती मशाली घ्या स्त्रियांनो
    का शिळा उध्दारण्या श्रीराम यावे?

    तू न अबला घे भरारी ऊंच गगनी
    फक्त सावित्रीस स्वप्नी का बघावे?

    सारखी मोनालिसा हसतेच आहे

    चेतनकुमार चौधरी's picture

    भास

    आजही तू भेटल्याचा भास आहे.
    अन हवेला मोगर्‍याचा वास आहे!

    मी तुझे सारे ऋतू जपले उराशी
    त्यातलाही ग्रीष्म माझा खास आहे.

    क्रुष्ण मी नाही, न तू राधा तरीही,
    का तुझ्या रात्रीत माझी रास आहे?

    मी जरी केला कसून अभ्यास होता

    निशिकान्त्'s picture

    बोलती माझ्या सवे

    आज अंधारात दिसती आठवांची काजवे
    जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे

    पापण्यातिल बंद स्वप्ने का सुकावी ही अशी?
    पालवी फुटण्यास त्यावर शिंपडावी आसवे

    सोनियाच्या गणपतीला चोरले पण शांत तो
    देवही हतबल जरासा जाहल्यागत जाणवे

    Syndicate content