गझल

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या गझलांची यादी... आपण आपली स्वतःची गझल या विभागात प्रकाशित कराच या शिवाय प्रकाशित गझलांचे रसग्रहण अथवा त्यावर चर्चा देखील प्रतिसादांच्या रूपाने करू शकाल

निशिकान्त्'s picture

मना भासते जाता जाता

सांज जाहली खेळ संपला मना भासते जाता जाता
पैलतिराची आस लागली तरी गुंतते जाता जाता

काय कमवले, काय गमवले हिशोब त्याचा व्यर्थ कशाला?
शुन्य राहिले झोळीमध्ये शल्य टोचते जाता जाता

खडतर जीवन असून माझे हसावयाचा सराव केला

वि.सु.सोळंके's picture

खंडीत मातृभूमी ................

अमृताला आज का भयं विषाचे वाटले
अरुनोदयाच्याच समयी ढग काळे दाटले

आटली नेत्रातली हि पावन गंगा
कारण मनसंन्याशाला अर्घ्य न द्यावे वाटले

जळून सारी राख येथे झाली मने
राखेतला फिनिक्स पक्षी न कुणास व्हावे वाटले

निशिकान्त्'s picture

जरा वेगळे वाटते रे

तुझ्या चाहुलीने मनी तेवते रे
मनाला जरा वेगळे वाटते रे

तुझे मस्त रेंगाळणे भोवताली
जरी ग्रिष्म, श्रावण सुखे पाहते रे

समुद्रास भरती फुका, चंद्र गगनी
दुरावा सदाचाच हेलावते रे

जुन्या आठवांची खुशी एवढी की

वि.सु.सोळंके's picture

माणसांची माणुसकी

सोडली का साथ माझी माणसांनी
राहिलो मी अकेला या ठिकाणी

राहिलो होतो मी येथे रीवाजाप्रमाणे
तरीही टाकले वाळीत मजला माणसांनी

कोणत्या ह्या जातीत माझा जन्म झाला
अस्पृश्य म्हणुनी धुळीत मिळवले मज माणसांनी

निशिकान्त्'s picture

जीवना रे

जीवना रे !

मी किती तडजोड केली जीवनारे?
का जगू मी वेळ गेली जीवनारे?

पत्करू शरणागती का अंत समयी?
आस जगण्याचीच मेली जीवनारे

भूक पोटी हास्य ओठी कसरतीची
खेळली दिनरात खेळी जीवनारे

कोरले दारिद्र्य भाळी, मी तरी पण

yogesh.tanmane's picture

महत्वाचं

माझ तिच्यावर प्रेम
तिच कुणा दुस-यावर प्रेम
आपलं एकतर्फी का असेना
तिला माझा विचार करायला भाग पाडतोय ते महत्वाचं

मी तर तिच्यासाठी सर्व द्यायला तयार
तिचा नेहमी नकार
पण तिला घ्यायला भाग पाडतोय ते महत्वाचं

निशिकान्त्'s picture

काबूत का करावे?

ओढाळ या मनाला काबूत का करावे?
जैसे मनास वाटे तैसे न का जगावे?

फुलपाखराप्रमाणे मन सैरभैर फिरते
रूढी परंपरांना जखडून का असावे?

पार्‍यात घोळले तू माझ्या मनास देवा
म्हणतोस लक्षमणाच्या रेषेत वावरावे

निशिकान्त्'s picture

भरारी घेतली (जुल्काफिया गजल)

भरारी घेतली (ज़ुल्काफ़िया गजल}

सोडले घरटे पिलांनी अन् भरारी घेतली
माय जी आधार होती, ती बिचारी जाहली

जीवनी मागे न बघण्या शिकविले होते तिने
वाट बघताना पिलांची ती जिव्हारी स्त्रावली

ना कधी आईस पुसले ना पित्याचे ऐकले

निशिकान्त्'s picture

मी वाजवू कशाला?

माझी जगात टिमकी मी वाजवू कशाला?
अंधार मस्त, दिवटी मी पेटवू कशाला?

आयुष्य घेतले मी देवाकडून उसणे
मग मालकी तयावर मी दाखवू कशाला?

बोलून आपुल्यांशी वाटे मनास हलके
डोळ्यात आसवांना मी साठवू कशाला?

देऊन लाख जखमा गेली कधी न कळले

yogesh.tanmane's picture

खरचं का मला प्रेम करता नाही आल

मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं
खरचं का मला प्रेम करता नाही आलं

आसवांनी मन आता ओलचिँब झालं
दुःखाच्या डोहात ते मनसोक्त न्हालं
प्रत्येकाच साठी नसतं गं हे व्यासपीठ खुलं
मला देता नाही आलं का तुला घेता नाही आलं